पनीर / अण्डा भूर्जी

साहित्यः 2  eggs फ़ेटुन घेणे अथवा पनीर कुसकरुन घेणे, २ कांदे , पाव भाजी मसाला, कांदा लसुण मसाला, तेल, हळद, मिरचीचे तुकडे

कृतीः सर्व प्रथम फ्रायपॅन मध्ये फोडणी करून घ्यावी. त्यामध्ये कांदा गूलाबी होईपर्यंत परतून घ्यावा. त्यात मिरचीचे तुकडे घालून परतावे. त्यामध्ये नंतर पनीर अथवा अण्डे घालून परतावे. परतताना  मिश्रण पॅनला चिकटणार नाही याची काळजी घ्यावी. मिश्रण कोरडे होत आले की त्यात मिठ, चिमुटभर साखर, तिखट, पाव भाजी मसाला, कांदा लसुण मसाला घालावा.

तयार झाल्यावार वरून कोथिंबीर घालून वाढावे. ही भुर्जी पावाचे स्लाईस अथवा पोळी बरोबर खाता येईल.

टिपः पाव भाजी मसाला नसेल तर बिर्यानी मसाला, छोले मसाला सुद्धा वापरला तरी चालेल.

~ by Sudarshan Apte on जानेवारी 3, 2008.

तुमचा अभिप्राय नोंदवा