दहिपोहे
घाई गडबडीत असताना दहिपोहे खूप पटकन तयार होतात.
साहित्य: जाड पोहे, दहि, थोडे दुध, साखर, चवीनुसार मिठ
कृती: एका भांडयात थोडे जाड पोहे घ्या. त्यात घट्ट दहि घाला. चवीनुसार साखर, मिठ घाला. गरज वाटल्यास थोडे दुध घालावे.
पहिल्यांदा करताना थोडे पोहे घ्यावेत. दहि पोहे तयार झाल्यावर फ़ुगतात. दहि पोहे करायच्या आधी पोहे धुवुन घेतले तरी चालतात.
टिप: तयार दहि पोहे झाल्यावर त्यामध्ये थोडी फ़ोडणीची मिरची घातली तर चवी मध्ये बहार येते.

तुमचा अभिप्राय नोंदवा